
एअरटेल आणि व्होडाफोननंतर रिलायन्स जिओनेही आपल्या प्लॅनची किंमत वाढवली आहे. कंपनीला नवा ‘ऑल इन वन प्लॅन’ 6 डिसेंबरपासून लागू होणार आहे. हा प्लॅन महागणार असला तरीही ग्राहकांना 300 टक्के अधिक फायदा मिळेल असा दावाही कंपनीने केला आहे. कंपनीच ग्राहकांना हे फायदे ऑफर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
199 रुपयांत एक महिन्याचा प्लॅन मिळणार असून दिवसाला 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. तर 399 रुपयांत 2 महिन्यांचा, 555 रुपयांत तीन महिन्यांचा आणि 2,199 रुपयांत 12 महिन्यांचा प्लॅन ग्राहकांना मिळू शकणार आहे. व्होडाफोन, आयडिया, एअरटेल आणि जिओ या तीन्ही कंपन्यांकडे जवळपास 100 कोटी ग्राहक आहेत. दरम्यान, व्होडाफोन आणि आयडियानेही आपल्या महागडय़ा प्लॅन्सची घोषणा केली असून हे प्लॅन 3 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.






















































