…तर शीख दंगल घडलीच नसती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1984 साली शीख दंगल ( 1984 sikh riot ) रोखण्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्याचा सल्ला इंद्रकुमार गुजराल यांनी तत्कालीन गृह मंत्री नरसिंह राव  ( narsimha rao ) यांना दिला होता. तो त्यांनी ऐकला असता तर शीख दंगल घडली नसती, असे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ( Manmohan Singh ) यांनी आज केले. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शीख दंगल उसळली त्याच रात्री गुजराल यांनी नरसिंह राव यांची भेट घेतली होती. दंगल रोखण्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्याशिवाय दुसरा चांगला उपाय नाही, असा सल्ला गुजराल यांनी दिला होता. परंतु नरसिंह राव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, असेही मनमोहन सिंग म्हणाले. सिंग यांच्या विधानाने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.