केरळमध्ये बलात्काराच्या आरोपीला जमावाने चोपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fight
file photo

केरळमधील वालायर येथे 2017 मध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला शनिवारी काही लोकांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले. सी. मधू असे त्या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. सी मधू याच्या डोक्याला व छातीला दुखापत झाल्याचे समजते.

जानेवारी 2017 मध्ये पलक्कड भागातील वालायर येथे 13 वर्षीय मुलीचा गळफास घेतलेला मृतदेह तिच्या घरात आढळून आला होता. त्या मुलीवर अनेक दिवसांपासून सामूहिक बलात्कार होत असल्याचे समोर आले होते.तिच्या लहान बहिणीने तिचा मृत्यू झाला तेव्हा दोन तरुणांना त्यांच्या घरातून बाहेर पडताना बघितले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी ती लहान बहिण देखील त्याच ठिकाणी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. तिच्यावर देखील बलात्कार झाल्याचे नंतर समोर आले होते. या घटनेनंतर केरळमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली होती.