
नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व बोगद्यांसह काही प्रमाणात कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र मागील 5 वर्षात पूर्णत: कालव्याची कामे ठप्प आहेत. या प्रकल्पातील कालव्यांच्या कामाला अधिकाधिक गती देऊन कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे महसूल व ऊर्जा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व विभागांना दिले आहेत. मुंबई मंत्रालय येथे उर्ध्व प्रवरा प्रकल्प निळवंडे 2 संदर्भात पाटबंधारे व संबंधित सर्व विभागाच्या अधिकार्यांची बैठकीत ते बोलत होते. यावेळी लाभक्षेत्रातील शेतकरी, प्रतिनिधीही मान्यवर उपस्थित होते
दुष्काळी तळेगाव भागासह उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरण हे बाळासाहेब थोरात यांनी ध्यास मानून पूर्ण केले. या धरणाच्या कामाबरोबरच कवठे कमळेश्वर, पिंपळगाव कोंझिरा, गणेश वाडी येथील मोठ मोठी बोगद्यांसह काही प्रमाणात कालव्यांची कामे मार्गी लावली. 2014 पर्यंत या कालव्याच्या कामांचा वेग चांगला होता मात्र सत्तांतर झाले आणि 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कालव्याची कामे पूर्ण ठप्प झाली. ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी अनेक वेळा थोरात यांनी तत्कालिन शासनाकडे पाठपुरावा केला, आंदोलने केली मात्र कामांना गती मिळाली नाही.
निळवंडे कालव्यांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी अनेकांनी विविध बातम्या, पत्रकांद्वारे प्रसिद्धी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या कालावधीमध्ये कोणताही निधी मिळाला नसल्याने कामे तशीच रखडलेली राहिली तळेगावसह दुष्काळी भागातील शेतकरी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या कामांबाबत कायम आग्रही राहिले. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कामाला पहिले प्राधान्य देत या कालव्याच्या कामासाठी संबंधित विभागाची अधिकार्यांची बैठक घेतली.
यावेळी बोलतांना थोरात म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हितासाठी आणि पाणीप्रश्न सोडवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाची सर्व कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रकल्पासाठी आता निधीची कमतरता पडणार नसून या कामाला आवश्यक ती तातडीने गती देऊन कालबद्ध कार्यक्रम करून त्याचे नियोजन करावे. व संबंधित कालावधीतच ही कालव्यांची कामे पूर्ण करावे, ही गावे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे सांगताना संबंधित सर्व विभागाला पूर्ण कामाचा आढावा घेऊन प्रकल्पाची पाहणी करण्यात येईल असेही सांगितले.
यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
1999 मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाटबंधारे रायमंत्री पदाची शपथ घेतली आणि पहिल्या दिवशी निळवंडेच्या कामाची बैठक घेऊन कामाला सुरुवात केली. सातत्याने पाठपुरावा करुन हे धरण मार्गी लावले. आता पुन्हा एकदा 2019 मध्ये मंत्रिमंडळ शपथ घेतल्यानंतर पहिलेच काम निळवंडे धरणाचे हाती घेतले आहे. यामुळे निळवंडेचे धरणाचे कालव्यांचे काम पूर्ण होणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.























































