चेंबूर हिंसाचार प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्यामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे चेंबूरमध्ये उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 3 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश क्राइम ब्रांचला दिले आहेत. आठ महिन्यांपूर्वी ठक्कर बाप्पा कॉलनीतील पंचाराम रिथाडिया यांची 17 वर्षांची मुलगी हरवली याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही आपली मुलगी सापडत नसल्याने पंचाराम यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली.

पंचाराम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली तेव्हा संतप्त जमावाने शिव-पनवेल महामार्ग रोखून धरला होता. एवढेच नव्हे तर, पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. या घटनेत दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी आपल्या मुलीचा शोध घेतला नाही तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा व आपल्या मुलीचा छडा लागावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात मुलीची आई मंजुदेवी रिथाडीया हिने ऍड. नितीन सातपुते यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.