
दिल्लीत अनाज मंडी येथे इमारतीला भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी येथील मुंडका भागात अचानक एका लाकडाच्या वखारीला आग लागली. सुदैवाने यात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, पोलीस व अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर निय़ंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील राणी झाँसी रोडवरील अनाज मंडी भागात एका चारमजली इमारतीला भीषण आग लागली होती. त्यात 43 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण यात गंभीर जखमीही झाले होते. आग लागली त्यावेळी इमारतीत मजदूर झोपले होते. त्यानंतर ही आग आजूबाजूच्या दोन इमारतींमध्येही पसरली होती.
Delhi: Fire breaks out in Mundka area.12 fire tenders rushed to spot. More details awaited.
— ANI (@ANI) December 14, 2019






















































