उत्तर प्रदेशमध्ये भर कोर्टात गोळीबार, दोन आरोपींचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचे चांगलेच धिंडवडे निघाले आहेत. ज्या कोर्टात न्यायदान होते, त्याच कोर्टात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये तीन लोकांनी एका प्रॉपर्टी डीलर आणि त्याच्या भाच्याची गोळ्या घालून खून केला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आज या तिघांची कोर्टात हजेरी होती. तेव्हा पोलिसांनी त्यांना कोर्टात आणले होते. कोर्टाच्या आवारातच शार्पशुटर्संनी त्यांना घेरले. तिथेच त्यांनी या आरोपींवर तुफान गोळीबार केला. यात गोळीबारात दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे. तर तिसर्‍या आरोपीच्या मृत्यूच्या माहितीला दुजोरा मिळालेला नाही.  जेव्हा गोळीबार झाला तेव्हा कोर्टातील एक जजही तिथे होते. त्यांनी वेळीच पळ काढल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला.