मोदींचे आयटी सेलच तुकडे-तुकडे गँग, रेणुका शहाणेंचा पंतप्रधानांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला शांततेचे आवाहन केलेले असतानाच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मोदींनाच खडे बोल सुनावले आहेत. ट्विटरवरील आपल्या अकाऊंटवर त्या म्हणाल्या की, ‘सर प्लीज तुम्ही लोकांना सांगा की त्यांनी तुमच्या सर्वच आयटी सेल हॅण्डलपासून दूर राहावे. कारण तुमच्या आयटी सेलमुळेच देशात अफवा पसरतात. तुमचे आयटी सेल म्हणजे खरे तर तुकडे-तुकडे गँग आहे.’

नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात जोरदार आंदोलने सुरू झाली आहेत. त्यातच आता बॉलीवूड कलाकारांनीही आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. सोशल माध्यमांवर त्या पसरू लागल्या आहेत. रेणुका शहाणे यांचे वक्तव्यही पसरले आहे. त्यात त्या पुढे म्हणतात, सर तुमचे आयटी सेल खोट्या बातम्या पसरवतात. ते बंधुभाव, शांतता आणि एकतेच्या विरोधात आहेत. त्यामुळे खरे तर तुमचे हे आयटी सेलच तुकडे-तुकडे गँग आहेत. त्यांना समाजात तिरस्कार पसरविण्यापासून प्लीज रोखा, असेही रेणुका आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.