
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीच्या परीक्षा 20 मार्चपर्यंत तर बारावीच्या परीक्षा 30 मार्चपर्यंत चालणार आहेत.
सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत आहे. दहा वाजण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये पोहोचावे लागेल. 10 ते सव्वादहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दिल्या जातील आणि त्यानंतरच्या पंधरा मिनिटांत प्रश्नपत्रिका वितरीत केल्या जातील. पहिल्याच दिवशी दोन्ही इयत्तांमधील विद्यार्थ्यांची व्होकेशनल विषयांची परीक्षा होणार आहे. परीक्षांचे निकाल जूनच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे.




























































