
लातूर येथे एका अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याची घटना घडली आहे. येथील एक अल्पवयीन मुलगा खासगी शिकवणीसाठी घरातून बाहेर पडला होता, तो घरी परत आला नाही. त्यामुळे मुलास पळवून नेल्याच्या संशयाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण अंतराम लहाने (रा. माकेगाव ता.रेणापूर) यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांचा इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणारा मुलगा ज्ञानेश्वर (वय 14) हा घरातून खाजगी शिकवणीसाठी म्हणून गेला. परंतु तो परत आलाच नाही. त्याचे मित्र, नातेवाईक, बसस्थानक, रेल्वेस्थानक असा सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.






























































