भविष्यवेत्ता नोस्ट्रदेमसने 2020 या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी…वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नोस्ट्रदेमसने सध्याच्या युगाबाबत काही शतकांपूर्वीच केलेली भविष्यवाणी तंतोतत खरी ठरली आहे. त्यांनी त्या काळात सांकेतिक भाषा आणि कवितांमध्ये भविष्यवाणी केली असल्याने त्याचा सांकेतिक अर्थ समजून त्याची योग्य ती सांगड घालावी लागते. 2001 चा अमेरिकेवरील हल्ला, हिंदुस्थानातील 2014 मध्ये झालेला सत्तापालट यासारखी त्यांची अनेक भविष्यकथनं खरी ठरली आहेत. त्यांनी 2020 साठी महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. त्याबाबतची चर्चा आता सुरू आहे.

2020 या वर्षात या शतकातील नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचे नोस्ट्रदेमस यांनी म्हटले आहे. तसेच आर्थिक संकट, गृहयुद्ध आणि तिसऱ्या युद्धाची संभाव्य परिस्थिती यामुळे या वर्षात मोठ्या प्रमाणात विनाश होण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे या वर्षात होणाऱ्या ग्रहबदलांमुळे हे वर्ष हिंसाचाराच्या गडद छायेत असेल असे अनेक भविष्यवेत्त्यांचे मत आहे. या वर्षात अनेक जागतिक स्तरावरील देशात मतभेद वाढणार आहेत. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण होण्याची भीती आहे. या वर्षात जगावर आर्थिक संकटाची छाया राहील, असे संकेत त्यांच्या भविष्यवाणीत दिसत आहेत. 2019 या वर्षात जागतिक अर्थव्यवस्था खालावली आहे. त्यामुळे नोस्ट्रदेमस यांचे आर्थिक संकटाचे भविष्य खरे ठरण्याची शक्यता दिसून येत आहे. हिंदुस्थानचा घसरलेला जीडीपी आणि अमेरिका-चीन व्यापारयुद्ध यामुळे मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.

indian-economyया आर्थिक आणि सामजिक परिस्थितीमुळे लोकांमध्ये जागरुकता वाढणार आहे. त्यामुळे आध्यात्मिकतेकडे लोकांचा ओढा वाढणार असल्याचे सांगत 2020 या वर्षापासून या शतकातील नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचे नोस्ट्रदेमस यांनी म्हटले आहे. अमेरिका आशियामध्ये 2020 मध्ये सर्वात मोठा युद्धसराव करणार आहे. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची त्यांची भविष्यवाणी खरी ठरण्याची शक्यता आहे. अनेक देशांमध्ये यादवी आणि गृहयुद्ध भडकणार असल्याने लोकांमध्ये आक्रमकता वाढेल आणि हिंसाचार भडकण्याचीही शक्यता आहे. हिंदुस्थानात नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी या मुद्द्यांवरून वातावरण तापले आहे. मध्यपूर्वेतील अनेक देश तसेच फ्रान्समध्येही वातावरण तापले आहे. या घटनाही नोस्ट्रदेमसच्या भविष्यावाणीशी पडताळून पाहण्यात येत आहेत. त्यांच्या भविष्यवाणीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो. तसेच अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या वर्षात मोठे नुकसान सहन करावे लागण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

या वर्षातील नोस्ट्रदेमस यांची मोठी भविष्यवाणी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्युबाबतची आहे. गेल्या 70 वर्षांमधील ही सर्वात मोठी दुःखद घटना असेल. त्यांच्या मृत्यूनंतर ब्रिटन शोकसागरात बुडेल, सुमारे 12 दिवस तेथील कामकाज ठप्प होईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. एलिझाबेथ यांच्यानंतर प्रिन्स चार्ल्स पदभार सांभाळतील असेही भविष्यवाणीत म्हटले आहे. तसेच ब्रेक्झिटबाबतचा ब्रिटनच्या भविष्याबाबतचा महत्त्वाचा निर्णही या वर्षात होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. हवामान बदलाचे दुष्परिणाम जगाला मोठ्या प्रमाणात जाणवू लागतील. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी जगभरातून पुढाकार घेऊन मोहीम राबवण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या वर्षात विकसित आणि विकसनशील देशांना वादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीनांही तोड द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे काही देशांवर दहशतवादी हल्ल्याचे संकट असल्याचे संकेतही नोस्ट्रदेमस यांनी दिले आहेत. 2020 या वर्षाच्या सुरुवातीला एक धूमकेतू पृथ्वीवरून जाईल आणि या वर्षातील विनाशकारी घटनांची सुरवात होईल, असे त्यांनी म्हटले आहे. अरबस्तान आणि मध्यपूर्वेतील देश, आफ्रिकेतील काही देशांमध्ये कट्टरतावाद वाढणार असल्याने अनेकांना स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे निर्वासितांची समस्या जागतिक स्वरूप धारण करणार आहे. या वर्षात विनाशकारी घटनांचे प्रमाण जास्त असले तरी संशोधन आणि वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी शोध लागणार असल्याने मानवजातीचे आयुष्य वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

twin-towers-2

हिंदुस्थानात 2014 मध्ये सत्तांतर होऊन नवे युग सुरू होईल, लेडी डायना यांचा मृत्यू, अॅल्डॉफ हिटलरचा उदय, अणुबॉम्बचा शोध, दुसरे महायुद्ध, अमेरिकेवरील 9 /11 चा हल्ला यासारख्या अनेक घटनांची नोस्ट्रदेमस यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत नोस्ट्रदेमस यांनी सांकेतिक स्वरूपात केलेली भविष्यवाणीही खरी ठरली आहे. दुसरे महायुद्ध आणि हिरोशिमा, नागासाकी अणुबॉम्ब हल्ल्याचे त्यांचे भविष्यही खरे ठरले आहे. विशेष म्हणजे नोस्ट्रदेमस यांनी स्वतःच्या मृत्युबाबतही अचूक भविष्यावणी केली होती. आपले अभ्यासाचे टेबल आणि पंलगाजवळ आपला मृतदेह सापडेल असे त्यांनी म्हटले होते. आपल्या मृत्युपूर्वी आदल्या रात्री त्यांनी ही भविष्यवाणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी ते मृतावस्थेत आढळून आले. स्वतःच्या मृत्युसह त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे 2020 बाबत त्यांनी केलेली भविष्यवाणी कितपत खरी ठरेल, याबाबत चर्चा सुरू आहेत.