एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेची मुदत वाढवा! शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य परिवहन महामंडळाने नवीन वर्षात सवलत धारकांसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. या योजनेसाठी ठेवलेल्या अंतिम मुदतीत वाढ करून वितरण व्यवस्थेत सुधारणा करा, अशी मागणी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांची विधान परिषदेत विशेष उल्लेखाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली.

राज्यातील 35 लाख ज्येष्ठ नागरिकांसह, दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त अशा 29 प्रकारच्या सवलतधारकांना 1 जानेवारी 2020 पासून स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत देऊ नयेत असे आदेश महामंडळाकडून संबंधितांना दिले आहेत.परंतु आजतागायत फक्त 26 लाख सवलतधारकांनी याकरीता नोंदणी केली आहे. त्यामुळे 9 लाख प्रवशांची सवलत बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन स्मार्ट कार्ड योजनेच्या अंतिम मुदतीत वाढ करावी व वितरण व्यवस्थेती त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी विलास पोतनीस यांनी केली आहे.