पालिका मुख्यालयातील काचा आता ‘ऍक्रॅलिक-लाकडा’च्या डिझाईनमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

पालिका स्थापत्य समितीची बैठक सुरू असतानाच काच कोसळून दुर्घटना झाल्यानंतर पालिकेने आता मुख्यालय इमारतीमधील सर्व तावदानांच्या भल्यामोठय़ा काचा ‘ऍक्रॅलिक आणि लाकडा’च्या मजबूत डिझाईनमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुख्यालयाच्या संपूर्ण इमारतीचा आढावा घेऊन नियोजन सुरू करण्यात आले आहे.

पालिका मुख्यालयात स्थापत्य समितीची बैठक सुरू असताना बुधवारी काच पडल्याची घटना घडल्याने पालिकेत अनेक ठिकाणी बसवण्यात आलेल्या मोठमोठय़ा काचांची तावदाने आणि काचांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका मुख्यालयाच्या इमारतीचे मेंटेनन्स ऑडिट करा, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत शिकसेनेसह सर्कपक्षीयांनी केली होती. या दुर्घटनेबाबत सभागृह नेत्या किशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा मांडून संपूर्ण इमारतीमधील काचांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीदेखील पालिका प्रशासनाला तातडीने ऑडिट करून सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

सल्लागारावर कारवाई होणार का?
पालिका मुख्यालयातील दुरुस्तीच्या कामात 2012 ते 2015 या कालावधीत अनेक ठिकाणी मोठमोठे काचेचे दरवाजे, काचेची तावदाने बसवण्याचे काम सल्लागाराच्या सल्ल्यानुसार करण्यात आले आहे. या काचा सुमारे तीन मीटर उंच तर सहा मीटर रुंदीच्या भल्यामोठय़ा आकाराच्या आहेत. परंतु या कामातील काच पडल्याने या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र याच वेळी पालिका प्रशासनाने स्वतः केलेले काम सुस्थितीत असल्याने सल्लागारावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.