भीमपराक्रम केल्यानंतरही रोहितला ‘या’ गोष्टीची खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा एकदिवसीय सामन्यातील उपकर्णधार आणि सलामीवर रोहित शर्मा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कटकमध्ये रोहितने 2017 या वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विराटच्या नावे असलेला विक्रम मोडीत काढला. तसेच या वर्षात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात 10 शतकांसह 2442 धावा करत सनथ जयसूर्याचा विक्रमही मोडीत काढला. या वर्षात भीमपराक्रम करूनही रोहितला एका गोष्टीची खंत आहे.

हे वर्ष आपल्यासाठी खूप चांगले आहे. संघाने सर्व सामन्यांमध्ये उत्तम प्रदर्शन केले आहे. आपणही या वर्षात आपल्या खेळाच्या मर्यादा ओळखून चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या संघाला विश्वचषक जिंकता आला नाही, याची खंत असल्याने रोहितने सांगितले. वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात ‘मॅन ऑफ सिरीज’चा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने मनातील ही खंत बोलून दाखवली. विश्वचषक सामन्यात रोहितने पाच शतके झळकवाली होती. मी खेळाचा आनंद घेत कोणत्याही दडपणाशिवाय खेळत आहे. संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्याचा आपला प्रयत्न असतो. आता आपल्या धावांचा सिलसिला असाच सुरू राहील. येणारे वर्ष आपल्या संघासाठी आणि आपल्यासाठी खूप काही घेऊन येणारे असल्याने ते खूप रोमांचक असेल, असेही त्याने सांगितले. आता मला माझ्या खेळातील मर्यादा समजल्या आहेत. त्यामुळे आपल्या क्षमतेचा पूरेपूर वापर करून खेळात अधिक प्राविण्य आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले. खेळात आपल्या मर्यादा आणि क्षमता ओळखून योग्य रणनीतीने खेळणे महत्त्वाचे असते. सध्या संघासमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, विजयाचा पूर्ण विश्वासही संघात आहे, असे तो म्हणाला.