
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे भंडारवाडी येथे खाजणात नवजात मृत अर्भक आढळले आहे. वरवडे गावचे पोलीस पाटील नंदकुमार खेडेकर यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. खंडाळा येथे राहणारे डॉक्टर तुषार चव्हाण मोटरसायकलने खंडाळा येथून वरवडेमार्गे रत्नागिरीला जात असताना ते भंडारवाडा येथे आले असताना त्यांचा मोबाइल फोन वाजला. मोबाइलवर बोलण्यासाठी थांबले असता त्यांना हे अर्भक आढळले. त्यांनी याबाबतची माहिती वरवडेच्या पोलीस पाटील यांना दिली. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे. या ठिकाणी हे अर्भक कोणी टाकले, याचा शोध पोलीस घेत आहेत.































































