बेकायदेशीर सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इब्राहिम पाचूसाब शेख यांनी सावकारी परवाना असताना वेगळया नावाने बेकायदेशीर सावकारी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी व्यंकट कदिरे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, इब्राहिम पाचूसाब शेख व्यवस्थापकीय भागीदार मे. एस.आर.मनिलॅर्डर्स भाग्य नगर लातूर यांनी सन 2019-20 वर्षासाठी सावकारी परवाना नुतनीकरण करुन मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला होता. सदर अर्ज तपासणी केला असता इब्राहिम पाचूसाब शेख यांनी सन 2018-19 चा परवाना मे. दत्त मनिलँर्डर्स, 5 नंबर चौक, न्यू भाग्य नगर या नावाने घेतलेला होता. मात्र त्यांनी दुसऱ्याच नावाने प्रस्ताव सादर करुन कायद्यानुसार गुन्हा केला. यासंदर्भात त्यांची चौकशी करण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली त्यामध्ये त्यांनी मुळ अनुज्ञाप्तीचे नुतनीकरण न करता दुसऱ्या नावाने प्रस्ताव सादर केल्याची कबूली दिली. परवाना एका नावाने आणि दुसऱ्या नावाने सावकारी व्यवसाय करुन कार्यालयाची तथा शासनाची दिशाभूल केली. म्हणून दिलेल्या तक्रार अर्जावरुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.