
युजर्सना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी व्हॉट्सऍप या इन्स्टंट मेसेंजिंग ऍपमध्ये आता डार्क मोडची सुविधाही मिळणार आहे. सध्या तरी हा मोड प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला असला तरी लवकरच ती अपडेट्सद्वारे सर्वांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. या डार्क मोडमध्ये तीन पर्याय मिळू शकणार आहेत.
या मोडमध्ये युजर्सना आणखी एक पर्याय दिला जाणार आहे तो म्हणजे ‘लो डेटा मोड’. म्हणजेच व्हॉट्सऍपही आपोआप डार्क मोडमध्ये जाणार आहे. विशेष म्हणजे डार्क मोड ‘बॅटरी सेव्हर’ म्हणूनही वापरता येणार आहे. बऱयाच दिवसांपासून व्हॉट्सऍपवर डार्क मोडची मागणी केली जात होती. तो आता व्हॉट्सऍपच्या नव्या व्हर्जनमध्ये दिला जाणार आहे. या ऍपमध्ये एक बग आढळला होता. त्यामुळे हे ऍप क्रॅश होत होते. मात्र कंपनीने आता तो बग काढून टाकला आहे. त्यामुळे व्हॉट्सऍप अपडेट केले नसेल तर ग्राहकांनी तो लगेच करून घ्यावा असे आवाहनही व्हॉट्सअप कंपनीने केले आहे.


























































