
भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर आणि क्लार्क या पदांकरिता नोकरभरती होणार आहे. या नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांची भरती झालीच पाहिजे या न्याय्य मागणीसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ प्रयत्नशील असून नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग महासंघातर्फे घेण्यात येणार आहेत. सदर नोकरभरतीसाठी जास्तीत जास्त भूमिपुत्रांनी अर्ज करावेत, असे आवाहन महासंघातर्फे करण्यात येत आहे.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार सदर नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग महासंघातर्फे घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, पहिला मजला येथे रविवार व सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), उल्हास बिले (9821878441) यांच्याशी संपर्क साधावा, असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी कळवले आहे.
भारतीय रेल्वेतर्फे क्लार्क या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी 13 नोव्हेंबर, तर स्टेशन मास्तर या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी 25 नोव्हेंबरपर्यंत rrbapply.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. उमेदवाराचे वय सर्वसाधारण वर्गाकरिता शासकीय नियमानुसार असेल तसेच आरक्षित प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादित शासकीय नियमानुसार सवलत असणार आहे. परीक्षेचा अर्ज, पात्रता, फॉर्म भरण्याची लिंक तसेच माहिती मिळवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.


























































