नाराज खडसेंचे वेट ऍण्ड वॉच, नेतृत्वाच्या कारवाईची वाट पाहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया करून पाडापाडीचे राजकारण करणाऱ्यांवर नेतृत्वाकडून काय कारवाई होतेय हे आपण पाहणार आहोत. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी तूर्तास ‘वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून कधीही पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची  राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी गेल्या काही दिवसांत जवळीक वाढली आहे. दिल्ली व त्यापाठोपाठ नागपूर येथे त्यांनी पवार यांची भेट घेतल्याने खडसे  भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र खडसे यांनी तूर्तास तरी भाजप सोडण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षांतर्गत विरोधकांवर काय कारवाई होतेय याची आपण वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खडसे आता किती दिवस वाट पाहणार आणि काय भूमिका घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.