‘या’ चित्रपटाच्या सिक्वलमधून पुनरागमन करणार शिल्पा शेट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shilpa-shetty-1

अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेली बरीच वर्षं रुपेरी पडद्यापासून दूर आहे. जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांच्या दोस्तानामधल्या एका गाण्यात ती शेवटची दिसली होती. त्यानंतर तिचा एकही चित्रपट आला नव्हता. पण, आता शिल्पा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

हा चित्रपट 2003साली आलेल्या एका हास्यपटाचा सिक्वल असणार आहे. 2003मध्ये आलेल्या हंगामा या चित्रपटाने धमाल उडवून दिली होती. अक्षय खन्ना, आफताब शिवदासानी, रिमी सेन, परेश रावल यांच्या अभिनयामुळे हंगामा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

त्याच हंगामाचा सिक्वल येत असून त्यातही परेश रावल असणार आहेत. हंगामा 2 या चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 14 ऑगस्ट 2020 रोजी झळकणार आहे.