
दिल्लीत आजही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मंडी हाऊस पासून मोर्चा काढला आहे. हा मोर्चा जंतर मंतर पर्यंत नेणार आहेत.
जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दंड थोपटले आहेत. आता विद्यार्थ्यांनी मंडी हाऊस ते जंतर मंतर पर्यंत मोर्चा काढला आहे. . पोलिसांनी बाराखंभा मार्गावर बॅरिगेट्स लावले आहेत. या ठिकाणी आंदोलनासाठी विद्यार्थीही जमा झाले आहेत. पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून जमावबंदी लागू केली आहे. तसेच पोलिसांच्या तीन तर सीआरपीएफच्या तीन तुकड्या तैनात आहेत. दिल्लीकरांना त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनी मंडी हाऊसकडे जाणार बरखंबा मार्ग, टॉलस्टॉय मार्ग आज वाहतुकीसाठी खुला ठेवला आहे.



























































