
रविवारची मस्त दुपार..मित्रासोबत दोन पेग मारण्याची हुक्की आल्याने तळीराम बारमध्ये आला, मात्र मॅनेजरने सुट्टे पैसे मागितले आहेत, असे सांगत बारमधील वेटरने या तळीरामाकडून 13 हजार रुपये घेतले. काही केळाने तळीरामाने या वेटरबाबत मॅनेजरला विचारले असता ‘नया है वह, किधर गया है कह, पता नही मुझे’ असे सांगत त्याने हात झटकले. त्यामुळे ‘चुना लगा के गया है कह’ अशी खात्री या तोतया वेटरबाबत झाल्याने तळीरामाने पोलीस ठाणे गाठले. त्याचा शोध सुरू असून या करामती वेटरमुळे तळीरामांना चढलेली झिंग उतरली आहे.
वागळे इस्टेट येथील अंबिकानगर परिसरात असलेल्या भीमगर्जना चाळीत सचिन सरोदे (31) राहतात. या भागातील खासगी क्लासेसमध्ये शिकविण्याचे काम करणारे सरोदे त्यांचा मित्र विनोद हादमेसोबत खोपट येथे असलेल्या कौलाक बारमध्ये गेला. या ठिकाणी तळमजल्यावर सरोदे बसले असता तेथील एका वेटरने येथे ग्राहक कमी असल्याने सर्क्हिस नीट देता येणार नाही. तुम्ही पहिल्या मजल्यावर जाऊन बसा, अशी विनंती या दोघांना केली. त्यानुसार सरोदे मित्रासोबत पहिल्या मजल्यावर जाऊन बसले. येथील दोन वेटरनी सरोदे यांनी मागवलेली क्कार्टर व पाणी दिले. त्यानंतर ते तळमजल्याकर निघून गेले. यावेळी सरोदे यांच्या टेबलच्या शेजारी उभ्या वेटरने त्यांच्याजवळ येत तुमच्याकडे दोन हजारांचे सुट्टे पैसे आहेत का, मॅनेजरने मागितले आहेत, असे सांगितले. सरोदे यांनी वेटरने असे सांगताच खिशातून सुट्टे पैसे काढले. मात्र पैशांचे बंडल पाहून वेटरने दोन हजार रुपयांचे आणखी सुट्टे मागितले. त्यामुळे सरोदे यांनी 500 रुपयांच्या 26 नोटा असे 13 हजार रुपये त्या केटरला दिले.
काही केळाने आधी ऑर्डर घेण्यासाठी आलेल्या केटरपैकी एकाने पुन्हा टेबलकर येत सरोदे यांना चकण्याची ऑर्डर किचारली. त्याकेळी सुट्टे पैसे घेऊन गेलेला वेटर कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी किचारला. मात्र त्याने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले, तर दुसरीकडे सरोदे यांनी खाली जाऊन मॅनेजरला किचारले असता तो केटर आमच्या हॉटेलमध्ये काम करत नाही. काही काम आहे का, असे विचारण्याकरिता आल्याचे मॅनेजरने सांगताच सरोदे यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.























































