उरणमध्ये ओएनजीसी विरोधात कामगारांची निदर्शने आणि घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरणमधील ओएनजीसी प्रकल्पातील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून प्रश्न सोडविण्याच्या मागण्यासाठी मंगळवारी ओएनजीसी प्रकल्पासमोर द्वारसभा घेण्यात आली. पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन(पीयुई ) या इंटक सलंग्न संघटनेकडून ही सभा घेण्यात आली. यावेळी ओएनजीसी कामगारांनी प्रश्न मार्गी लागले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कामगार मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित होते. प्रकल्पात होत असलेल्या तेल गळतीच्या घटनांमुळे आगीचा धोका वाढला आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

ओएनजीसी प्रकल्पातील व्यवस्थापन जाणीवपूर्वक कामगारांच्या मागण्या मान्य करुनही त्याची अंगलबजावणी करीत नाही. मागील चाळीस वर्षात प्रकल्पात काम करीत असलेल्या कामगारांना वेतनवाढ, वैद्यकीय सुविधा, भोजन व्यवस्था,कंत्राटदाराकडून देण्यात येणारा त्रास या संदर्भात या द्वारसभेत नेत्यांनी आपली मते मांडली. तसेच कागगार संघटनेला मान्यता देण्याचीही मागणी करणयात आली आहे. कामगारांना योग्य तो न्याय न दिल्यास पेट्रोलियम एम्लॉईज युनियनकडून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे सचिव नंदकिशोर खानविलकर यांनी दिली. तसेच ओएनजीसी व्यवस्थापनाला जागे करण्यासाठी तसेच उरणमधील नागरिक व कामगारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामपंचायतीच्या विकासाकरीता प्रश्न मांडले जातील अशी माहीती त्यांनी यावेळी दिली. यावेळी स्थानिक कामगार नेते अरविंद घरत यांनी कामगारांच्या समस्यांचा पाढा मांडला. यावेळी कामगारांतर्फे घोषणाबाजी करण्यात आली.