
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या कर्जमाफीबद्दल किसान क्रांती आणि राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना बैलगाडीची प्रतिकृती तसेच फळे, भाजीपाला आणि धान्य भेट दिले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आनंदी हवा ही शासनाची भूमिका असल्याचे सांगितले. याप्रसंगी गृहमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री जयंत पाटील, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. शिष्टमंडळात संदीप गिड्डे, लक्ष्मण वंगे, शंकर दरेकर, अरुण कान्होरे, नितीन थोरात, माऊली हळणवार, उमेश शिंदे, विजय गाजरे, माधव पाटील, राजाराम पाटील, नितीन बागल, शहाजहान शेख, धनाजी चव्हाण, युवराज सुर्यवंशी, महेश राणे, अतिश गरड, योगेश ओव्हाळ, तुकाराम सुर्यवंशी, सौरभ वाव्हळ, ओंकार बिरदवडे, दत्तात्रय गाजरे आदींचा समावेश होता.

























































