
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पिट्टीगुडा येथील आश्रमशाळेच्या अधीक्षकाने शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पिट्टीगुडा गावातील खेमाजी नाईक आश्रमशाळेतील ही घटना असून, सुभाष पवार (42) असं आत्महत्या करणाऱ्या अधीक्षकाचं नाव आहे. संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप असून, तशी चिठ्ठीही सापडल्याचं सांगितलं जात आहे.




























































