
सीमेपलीकडून शस्त्रसंधींचे उल्लंघन करणार्या दोन पाकिस्तानी सैनिकांना हिंदुस्थानी जवानांनी कंठस्नान घातले आहे. पाकिस्तानी सैन्याने आधी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. त्याला हिंदुस्थानी सैन्याने जोरदार प्रयुत्तर दिले. त्यात पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले.
शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर हिंदुस्थानने दिलेल्या प्रत्युत्तरात दोन सैनिक मेल्याची कबुली खुद्द पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. जम्मू कश्मीरच्या उरी आणि सिलीकोट भागात पाकिस्तानने काल गोळीबार केला त्यात एक हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला तर एका महिलेचाही मृत्यू झाला आहे.
























































