
औसा तालुक्यातील मौजे वडजी येथे गेल्या काही दिवसापासून अवैध दारू विक्री वाढल्याने वडजी येथे महिला ग्रामसभा घेण्यात येऊन या ग्रामसभेत एकमुखी ठराव हा दारूबंदी करणेबाबत घेण्यात आला.
औसा तालुक्यातील मौजे वडजी तालुका औसा हे गाव तीन ते चार हजार लोकवस्तीच्या असून भादा पासून दोन किलोमीटर वर असल्याने आणि भादा येथे अवैध धंदे विशेष करून दारूविक्री बंद असल्याने अवैध धंदे वाल्यांचा कल वडजी शिवारात आहे यामुळे या छोट्याशा वडजी गावाच्या हाद्दीत 3 देशी दारू दुकान थाटल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने त्याचा त्रास महिलांना होतो. यामुळे 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वडजीचे सरपंच प्रतिभाताई भरत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये प्रथम दैवशाला रामानंद माळी यांनी ठराव मांडला की गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी. यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली आणि परिसरात अवैध दारू विक्री चालविणारे चतुर्भुज किसन माळी, दगडू बालाजी मुळे येथील भादा येथील कैकाडी या व्यक्तीचा अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय चालू असल्यामुळे दारू पिऊन गावात मोठ्या प्रमाणात भांडण-तंटे होत आहे. तरी गावातील व परिसरातील सुरू असलेले दारूची अवैध धंदे व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावे, असा ठराव पोलीस ठाणे भादा आणि वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

































































