
चुलत्याच्या घरात घुसून पुतण्याने काकाच्या डोक्यात फरशी घालून त्याचे डोके फोडले. सोडवण्यास आलेल्या काकीलाही मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
या मारहाण प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दयानंद कर्णअप्पा तानवडे यांनी तक्रार दाखल केली आहे. 26 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे आल्या घरी पत्नी भारती, आई यांच्यासोबत असताना त्यांचा पुतण्या नितीन मधूकर तानवडे हा तिथे आला. अकारण शिवीगाळ करत असता त्यास उगीच शिवीगाळ करु नको, असे सांगत असताना त्याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. तिथे पडलेली फरशी उचलून फिर्यादीच्या डोक्यात घालून डोके फोडल. सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीलाही मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. वैद्यकीय उपचार घेऊन त्यांनी पुतण्याविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी नितीन मधूकर तानवडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

































































