>> नीलिमा प्रधान
मेष – लोकप्रिय व्हाल
नवीन वर्षात तुमच्या यशाची पताका नक्कीच फडकणार आहे. खंबीर रहा. प्रवासात सावध रहा. सूर्य-चंद्र लाभयोग आणि बुध-गुरू युती प्रेरणादायी ठरेल. कुटुंबातील समस्या कमी होतील. लोकप्रिय व्हाल. घर, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शुभ दिनांक ः 29, 30
वृषभ – परीक्षेचा कालावधी
चंद्र-शुक्र युती आणि चंद्र-मंगळ केंद्रयोग होत आहे. प्रयत्न, जिद्द कायम ठेवा. तुमच्या कार्याला गतिमान ठेवण्याचा विचार ढळू देऊ नका. अर्थात अपेक्षा ठेवू नका. या वर्षात परीक्षेचा कालावधी अनुभवायचा आहे. कुटुंबात संयम ठेवा. नोकरीत उतावीळपणे वागू नका. गुंतवणूक करताना मोह टाळा. शुभ दिनांक ः 30, 31
मिथुन – प्रगतीचा मार्ग मिळेल
सूर्य-चंद्र लाभयोग आणि बुध-गुरू युती होत आहे. नवीन वर्षात तुमच्या यशाचा सूर्योदय नव्याने होईल. व्यवसाय, नोकरीत समस्या कमी होतील. प्रगतीचा मार्ग मिळेल. थकबाकी वसूल करा. क्षुल्लक तणाव होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी करणारी घटना घडेल. मातब्बर लोकांचा सहवास मिळेल. शुभ दिनांक ः 30, 31
कर्क – दुष्टचक्रात अडकाल
चंद्र-मंगळ त्रिकोण योग आणि चंद्र-हर्षल युती होत आहे. नवीन वर्षात तुम्हाला विविध अनुभव येतील. शिकायला मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याचे पालन करून निर्णय घ्या. मोह टाळा. दुष्टचक्रात अडकाल. नवीन परिचय उत्साहवर्धक वाटला तरी भाळून जाऊ नका. पोटाची काळजी घ्या. शुभ दिनांक ः 2, 3
सिंह – प्रकृतीकडे लक्ष द्या
सूर्य-चंद्र लाभयोग आणि बुध-गुरु युती होत आहे. नवीन वर्षाची सुरुवात यशाचा झेंडा रोवणारी ठरेल. नोकरी, व्यवसायात कलाटणी मिळेल. योजनांना गती देता येईल. महत्त्वाच्या निर्णयात तणाव होईल. मतभिन्नता होईल. कोर्ट केस संपवता येईल. धावपळ वाढेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. शुभ दिनांक ः 30, 31
कन्या – कलाटणी मिळेल
चंद्र-मंगळ त्रिकोणयोग आणि बुध-गुरू युती होत आहे. नवीन वर्षात तुमच्या योजनांना वेगळीच कलाटणी मिळेल. तुम्ही कल्पना करणार नाही असा अनुभव येईल. नोकरी, व्यवसायात बदल करणे योग्य ठरणार नाही. राजकीय क्षेत्रात नविन परिचय होतील. मतप्रदर्शन सावधपणे करा. कायदा मोडू नका. शुभ दिनांक ः 29, 2
तूळ – कोर्ट केस संपवाच
सूर्य-चंद्र लाभयोग आणि बुध-गुरू युती होत आहे. नवीन वर्षात प्रेरणा देणारी घटना घडेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. वसुली करा. नवा परिचय फायदेशीर ठरेल. गुरुवार, शुक्रवार दगदग होईल. गैरसमज होतील. कोर्ट केस संपवाच. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन कराल. शुभ दिनांक ः 30, 31
वृश्चिक – परदेशात जाल
बुध-हर्षल त्रिकोणयोग आणि बुध-गुरू युती होत आहे. साडेसाती संपण्याच्या मार्गावर आहे. नवीन वर्षात तुमच्या मनाच्या मोठेपणाचे लोकांना दर्शन होईल. त्यामुळे विचारपूर्वक बोला. कायद्यानेच निर्णय घ्या. नोकरी-व्यवसायात जम बसेल. परदेशात जाल. कलाक्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठाल. शुभ दिनांक ः 29, 2
धनु – आत्मविश्वास वाढेल
चंद्र-मंगळ केंद्रयोग आणि बुध-गुरू युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. नवीन वर्षात तुमची प्रगती कोणी रोखू शकणार नाही. आत्मविश्वास वाढेल. अहंकाराला लगाम घाला. रेंगाळलेले काम पूर्ण करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनुभवांचा उपयोग करा. कौटुंबिक समस्या सोडवता येईल. शुभ दिनांक ः 30, 31
मकर – अधिक खंबीर व्हाल
चंद्र-शुक्र युती आणि चंद्र-मंगळ त्रिकोणयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. नवीन वर्ष कसोटीचे आहे. मात्र त्यामुळेच तुम्ही अधिक खंबीर व्हाल. अनुभवाचे नवे गाठोडे तयार होईल. नोकरीत चूक टाळा. व्यवसायात नवीन परिचय झालेल्या व्यक्तीवर एकदम विश्वास टाकू नका. स्वतःच्या विकासाचा योग्य सल्ल्याने विचार करा. शुभ दिनांक ः 31, 2
कुंभ – प्रयत्नांचा वेग वाढवा
सूर्य-चंद्र लाभयोग आणि बुध-गुरू युती होत आहे. नवीन वर्षात तुमचे महत्त्व वाढेल. कार्याला नवी दिशा मिळेल. नोकरी-व्यवसायात फायदेशीर बदल करा. प्रयत्नांचा वेग वाढवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळेल. कुटुंबासाठी चांगला निर्णय घ्याल. विवाह, संततीप्राप्तीचा प्रयत्न करा. नवा टप्पा गाठाल. शुभ दिनांक ः 2, 3
मीन – ध्येय पूर्ण करा
बुध-हर्षल त्रिकोणयोग आणि सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो तुमच्या प्रगतीचा वेग वाढतच जाईल. ग्रहांची साथ आहे. ध्येय पूर्ण करा. घर, वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण करा. आठवडय़ाच्या सुरुवातीला घरातील व्यक्तींना दुखवू नका. वेळ फुकट घालवू नका. स्पर्धा जिंकाल. शुभ दिनांक ः 3, 4




























































