
आष्टी तालुक्यातील पोखरीजवळ शुक्रवारी पहाटे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कार झाडावर आदळली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नगरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जामखेड-आष्टी महामार्गावर झालेल्या अपघातात वाहनात चालक आणि दोन प्रवाशी होते. आष्टी तालुक्यातील पोखरीजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती पुलावरून खाली उतरून झाडावर आदळली. या अपघातात वाहनचालक विशाल उर्फ बंटी काकासाहेब पवार (वय 30, रा.जामखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पवन गायकवाड (वय 31, रा.जातेगाव) आणि आकाश अभिमन्यू उगले (वय 32, रा. जामखेड) हे दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

























































