
नव्या वर्षात म्हणजेच 2020 सालामध्ये बँक हॉलिडे कुठले आहेत याची नोंद प्रत्येकजण ठेवत असतो. बाहेरगावी गेल्यानंतर बँकांमध्ये जाण्याची वेळ आलीच तर बँक हॉलिडे पाहून मगच बँकांमध्ये जावे लागते. आपल्याकडे नोंद असेल तर बँक व्यवहारांमध्ये अडचणी येत नाहीत. रिझर्व्ह बँकेने 2020 सालामध्ये बँकेचे व्यवहार कोणत्या दिवशी बंद राहणार त्यासाठीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट), महात्मा गांधी (2 ऑक्टोबर) या दिवशी खासगी आणि सरकारी बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. याशिवाय बुधवार, 1 जानेवारी (नवीन वर्षारंभ), 15 जानेवारी-बुधवार (मकर संक्रांत), 26 जानेवारी- रविवार (प्रजासत्ताक दिन), 21 फेब्रुवारी-शुक्रवार (महाशिवरात्र), 10 मार्च-मंगळवार (होळी), 2 एप्रिल-गुरुवार (रामनवमी), 6 एप्रिल-सोमवार (महावीर जयंती), 10 एप्रिल-शुक्रवार (गुड फ्रायडे), 14 एप्रिल-मंगळवार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), 1 मे-शुक्रवार (महाराष्ट्र दिन, कामगार दिन), 7 मे-गुरुवार (बुद्ध पौर्णिमा), 31 जुलै- शुक्रवार (बकरी ईद), 3 ऑगस्ट-सोमवार (रक्षाबंधन), 11 ऑगस्ट-मंगळवार (श्रीकृष्ण जन्माष्टमी), 30 ऑगस्ट-रविवार (मोहरम), 2 ऑक्टोबर-शुक्रवार (महात्मा गांधी जयंती), 26 ऑक्टोबर-मंगळवार (विजयादशमी), 30 ऑक्टोबर-शुक्रवार (ईद ए मिलाद), 14 नोव्हेंबर-शनिवार (दिवाळी), 16 नोव्हेंबर- सोमवार (भाऊबीज), 30 नोव्हेंबर-सोमवार (गुरुनानक जयंती), 25 डिसेंबर-शुक्रवार (ख्रिसमस).























































