अंशुमन गायकवाड, शांता रंगास्वामी यांची आरोपातून मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नीती अधिकारी डी. के. जैन यांनी अंशुमन गायकवाड व शांता रंगास्वामी यांची हितसंबंधाच्या आरोपातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. हितसंबंधाबाबतची नोटीस आल्यानंतर या दोघांनी क्रिकेट सल्लागार समितीच्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत काही अर्ध उरला नाही असे जैन यांचे म्हणणे आहे. मात्र कपिलदेव यांच्या प्रकरणात तक्रारदाराने अपील करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांच्याबाबतचा निर्णय होऊ शकला नाही.

माजी कर्णधार कपिलदेक यांच्या अध्यक्षतेखालील ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये माजी कसोटीपटू अंशुमन गायककाड आणि रंगास्कामी यांचा समाकेश होता. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे आजीक सदस्य संजीक गुप्ता यांनी या तिन्ही सदस्यांकिरोधात परस्पर हितसंबंधाचे पुरावे सादर करून तक्रार केली होती. ‘बीसीसीआय’चे नीती अधिकारी डी. के. जैन यांनी हितसंबंधांकरून या तिघांना नोटीस पाठवून 10 ऑक्टोबपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर या तिघांनीही क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा दिला. रंगास्कामी यांनी आपला राजीनामा प्रशासकीय समितीसह बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठकला. अंशुमन गायकवाड यांनी नीती अधिकारी यांच्यासमोर आपली बाजू मांडली. गायकवाड आणि रंगास्वामी यांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने डी. के. जैन यांनी त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीची फाइल बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र कपिल देव यांच्याबाबतचा निर्णय राखून ठेवला.