बिहारमध्ये जागावाटपावरून जेडीयू आणि भाजपात जुंपणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा अवकाश असला तरी आतापासूनच जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भाजपमध्ये जागावाटपावरून जुंपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येणाऱया विधानसभा निवडणुकीत जेडीयूला अर्ध्याहून अधिक जागा हव्यात असा सूर आज पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आळवला आहे. त्यामुळे बिहारमधील जागावाटप दोन्ही पक्षांसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे.

बिहारमध्ये सध्या जेडीयू, भाजप आणि लोकजनशक्ती पार्टीचे संयुक्त सरकार आहे. हे तिन्ही पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. बिहार विधानसभेची निवडणूक वर्षभरानंतर होणार आहे. त्याआधीच जेडीयूने 2009 सालच्या जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची वेळ आली असून त्यामध्ये आम्हाला आर्ध्याहून अधिक जागा हव्यात असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. याबाबत भाजपचे नेते नितीन नवीन यांनी नाराजी व्यक्त केली असून जागावाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठाr घेतील असे स्पष्ट केले आहे.

राज्यात एनआरसी लागू करणार नाही

देशात सध्या एनआरसीवरून गदारोळ सुरू आहे. मात्र याबाबत जेडीयूची भूमिका स्पष्ट असून एनआरसी बिहारमध्ये लागू केली जाणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. याआधीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही हे स्पष्ट केले असल्याचे ते म्हणाले.