आता टीव्ही बघणे स्वस्त होणार, ट्राय जुन्या शुल्कात बदल करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cable-tv

टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दूरसंचार क्षेत्रात अनेक बदल केल्यानंतर आता प्रसारण क्षेत्रात नवीन नियम लागू करण्याबरोबरच जुन्या शुल्कामध्ये सुधारणा करण्याचीही तयारी सुरू केली असून नववर्षात डीटीएच आणि केबल टीव्ही ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

एप्रिल 2019 मध्ये ट्रायने डीटीएच आणि केबल टीव्ही शुल्काचे नवीन नियम लागू केले होते. या नियमांमुळे टीव्ही बघणे पूर्वीपेक्षा खूपच महाग झाले. नेटवर्क कॅपेसिटी फी (एनसीएफ) मध्ये बदल झाल्यामुळे दर महागले. आता डीटीएच आणि केबल टीव्ही ग्राहकांना 153 रुपये एनसीएफ द्यावा लागेल. तसेच स्वतंत्रपणे निवडलेले चॅनेलही आता अधिक महाग झाले आहेत. ट्राय आता हे कमी करण्याचा विचार करीत आहे. ग्राहकांना केबल टीव्ही किंवा डीटीएच सबक्रिप्शनसाठी जास्त पैसे खर्च करावे लागू नये हा या मागील उद्देश आहे.

कंटेंट शुल्क भरावे लागेल
टीव्ही बघण्यासाठी एनसीएफ आणि कंटेंट शुल्क असे दोन प्रकारचे शुल्क असते. सबस्क्रायबर्सने दिलेले एनसीएफ शुल्क टीव्ही चॅनेलच्या ब्रॉडकास्टरच्या खात्यावर जमा होईल. एनसीएफ शुल्क हे डीटीएच किंवा केबल ऑपरेटरला चॅनेल दाखवण्यासाठी दिले जाते. यात वापरकर्त्यांना 100 वाहिन्यांसाठी 153 रुपये दरमहा द्यावे लागतात.