
साईबाबांना दिल्लीतील एका भाविकाने सुवर्णमंडित शंख अर्पण केला आहे. या शंखाची किंमत पंधरा लक्ष रुपये आहे. रक्षी शर्मा दिल्ली असे या भाविकाचे नाव आहे.
साईबाबा संस्थानकडील एका पांढऱ्या शुभ्र शंखाला साडेबारा लक्ष रुपये किमतीचे तीस तोळ्याचे सुवर्ण नक्षीकाम करण्यात आले आहे. मजुरीसह या शंखाची किंमत पंधरा लक्ष रुपये आहे. रोज काकड आरतीला शंखातून साई मूर्ती व समाधीला जलधारेने स्नान घालण्यात येते. यापुढे शंख वापरण्यात येणार आहे. दुपारच्या मध्यान्ह आरतीपूर्वी शर्मा कुटुंबाने हा सुवर्णमंडीत शंख संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मंदीर प्रमुख रमेश चौधरी, राजेंद्र जगताप आदींची उपस्थित होती.
शर्मा कुटुंबाने यापूर्वी शताब्दी वर्षात दहा लाख रुपये किंमतीचा सोन्याचा डबा साई चरणी अर्पण केला होता.



























































