मस्तक बर्फात, पाय पाण्यात; हिंदुस्थानात हवामान बदलाचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cold-rain

आशियातील हिंदुस्थान उपखंडात तीन ऋतू प्रामुख्याने पहायला मिळतात. उन्हाळा, पावसाळा, उन्हाळा. पण गेल्या काही वर्षांमध्ये हे समीकरण थोडं बदलल्याचं दिसू लागलं आहे. आता युरोपीयन देशांप्रमाणे हिंदुस्थानात देखील अवकाळी पाऊस पडू लागला आहे. थंडीचे वेळापत्रक देखील बिघडले आहे. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार नववर्षाची सुरुवात होत असताना संपूर्ण हिंदुस्थान कडाक्याची थंडी अनुभवत असतो. मात्र यंदा नवीन चित्रपाहायला मिळत आहे.

बुधवारी सकाळी हिंदुस्थानच्या उत्तरेकडील जम्मू-कश्मीर, हिमाचल, उत्तराखंड राज्यांतील काही भागात हिम वर्षा झाली. पश्चिमेकडील राज्यांपासून पूर्वेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. तर दक्षिणेत तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यापूर्वी संपूर्ण हिंदुस्थानात या दरम्यान कडाक्याची थंडी अनुभवायला मिळायची तर मात्र आता उत्तर – दक्षिणेच्या वातावरणात कमालीची तफावत पाहायला मिळत आहे.

त्यामुळे हिंदुस्थान उपखंडात आता पूर्वीप्रमाणे ऋतूमान राहिले नसून बदल ठळकपणे जाणवू लागले आहेत.