31 डिसेंबरचा ‘हँगओव्हर’ उतरवण्यासाठी सोप्या टिप्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी रात्री धम्माल पार्टी केली असेल आणि यामध्ये मद्याचा वापर झाला असेल तर हँगओव्हर उतरवण्यासाठी या टिप्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
रिकाम्या पोटी पिण्यास सुरूवात करू नका
31 डिसेंबरची पार्टी झाली असली तरी आता नवंवर्षाची पार्टी बाकीच असेल. तिथे तुम्ही हमखास खाणार आणि पिणार. परंतु हे लक्षात ठेवा की पोटात काही नसताना अल्कोहोलयुक्त पेय घेणे सुरू करू नका. पोटाच्या अनेक समस्यांमुळे लवकर हँगओव्हर होऊ शकतो. त्यामुळेच मद्यपान करण्यापूर्वी पॅरासिटामॉल किंवा अँटासिड खा जेणेकरून अ‍ॅसिडिटी आणि हँगओव्हरपासून तुम्ही वाचाल.
हँगओव्हर झटकन उतरवण्यासाठी

सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले अधिकाधिक पाणी प्या. त्या नंतर ब्लॅक टी किंवा चहा, कॉफी हे नक्की घ्या. कारण कॅफिनमुळे उर्जा मिळते आणि मेंदू ताजातवाना होतो. वॉर्मअप करून वेळेवर अंघोळ करा. त्यामुळे रात्रीच्या पार्टीचा हँगओव्हर उतरेल. काहीतरी गोड खा, त्याने लगेचच बरे वाटेल.

या परिणामांसाठी तयार रहा

हँगओव्हर लवकर उतरवण्यासाठी जास्त पाणि प्यावे लागेल आणि कॅफिनसाठी कॉफी किंवा मग कोरा चहा घ्यावा लागल्याने वारंवार लघुशंकेला जावे लागते. इतकंच नाही तर अनेकवेळा शौचालयास जाण्याची ही तयारी ठेवावी लागेल.

डुलकी

अंघोळ झाल्यानंतर नाश्ता करून थोडा वेळ शिल्लक असेल तर पॉवर नॅप घ्या. उठल्यानंतर साध्या पाण्यात मध टाकून पिणे किंवा आल्याचा चहा घेतल्यास त्याने शरीर आणि मेंदूला ताजेतवाने वाटेल.

न्यू ईयर पार्ट्या जानेवारीचा पहिला आठवडाभर सुरूच राहतात याचा अर्थ की आपण जाऊन बीयर, वोडका, वाइन किंवा अल्कोहोल हे घ्यावे असे नाही. इतर कोणत्याही सॉफ्ट ड्रिंकची निवड देखील करू शकता.

डोके दुखी किंवा अॅसिडिटीचा त्रास न होण्यासाठी काही औषधे सोबत ठेवावित, जेणेकरून शरीर दुखी, डोके दुखी, अॅसिडिटी यापासून त्रास होणार नाही.