
साहित्य –
4 मध्यम कच्ची केळी, 1 इंच किसलेले आले, अर्धा चमचा वाटलेली किंवा मिक्सरमधून काढलेली हिरवी मिरची, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा धनेजीरे पूड, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा गरम मसाला, 15 ते 20 बेदाणे, अर्धा वाटी ब्रेड कब्ज, चवीपुरते मीठ, ब्रेडकब्ज बाहेरून कोट करायला.
कृती –
1) प्रत्येक केळ्याचे 2 तुकडे करावे. सालासकट कुकुरमध्ये तीन शिट्ट्या करून व्यवस्थित शिजवून घ्यावेत. केळी शिजली की साल काढून आतला गर किसून घ्यावा.
2) किसलेल्या केळ्यात आले, मिरची, कोथिंबीर, धने-जिरेपूड, चाट मसाला, गरम मसाला, पाव वाटी ब्रेजकब्ज आणि मीठ घालून चांगले मळून घ्यावे.
3) यानंतर त्याचे लिंबाएवढे छोटे गोळे करून घ्यावे. आत एक ते दोन बेदाणे घालून कटलेट करावे. कटलेटना थोडा पाण्याचा हात लावून ब्रेडकब्जमध्ये घोळवावे.
4) कटलेट गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे.
5) हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करावे.































































