
हिंदुस्थानविरुद्धच्या टी-20 क्रिकेट मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा झाली. या संघात अनुभवी अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजची तब्बल 18 महिन्यांनंतर श्रीलंकेच्या टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपची दुखापतीमुळे निवड झाली नाही, तर शेहान जयसुर्याला हिंदुस्थान दौऱयासाठी वगळण्यात आले आहे.
लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या खडतर हिंदुस्थान दौऱयाची सुरुवात गुवाहाटीमध्ये 5 जानेवारीपासून होणार आहे. अँजलो मॅथ्यूजच्या पुनरागमनामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा इतर युवा खेळाडूंना मिळेल. हिंदुस्थान-श्रीलंकादरम्यान आतापर्यंत सहा द्विपक्षीय टी-20 मालिका झाल्या असून यातील पाच ‘टीम इंडिया’ने जिंकल्या, तर एक मालिका बरोबरीत सुटली होती. उभय संघांमध्ये आतापर्यंत 16 टी-20 लढती झाल्या असून यात हिंदुस्थानने 11, तर श्रीलंकेने 5 विजय मिळविले आहेत. हिंदुस्थान-श्रीलंका दरम्यानचा दुसरा टी-20 सामना 7 जानेवारीला इंदूरमध्ये, तर तिसरा व अखेरचा सामना पुण्यात 10 जानेवारीला होईल.
श्रीलंकेचा टी-20 संघ ः लसिथ मलिंगा (कर्णधार), कुशल परेरा, गुनातिलका, अविष्का फर्नांडो, राजपक्सा फर्नांडो, शनाका, डिकवेला, कुशल मेंडिस, हसारंगे, संदाकन धनंजया, कुमारा, इसरू उडाना, कासुन रजिता.























































