
कडाक्याच्या थंडीत चुलीजवळ बसून शेकोटी घेत असताना साडीने पेट घेतला. यात एका वृध्द महीलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे घडली आहे. वैजंताबाई रंगनाथ घुंबरे (60) असे या महिलेचे नाव आहे.
परभणीत कडाक्याची थंडी पडली असून ऊब मिळवण्यासाठी घरोघरी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. 1 जानेवारी रोजी वैजंताबाईघरातील पेटवलेल्या चुलीसमोर उब मिळावी म्हणून बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. याचवेळी घरात कोणीही नसल्याने त्यांच्या किंचाळ्या ऐवूâन गल्लीतील काहींनी त्यांना मदत करेपर्यंत सदरील त्या 74 टक्के भाजून गंभीर झाल्या होत्या. गावातील शासकीय रुग्णवाहिकेद्वारे त्यांना परभणीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान आज गुरुवारी पहाटे 5 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपुर्ण वाघाळा गावावर शोककळा पसरली आहे.

































































