
चिमेस एव्हिएशनचे एक ट्रेनी विमान धावपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या एका शेतात कोसळले. या दुर्घटनेत मुंबईतील रहिवासी दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्हय़ातील ढाना येथे शुक्रवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. अशोक मकवाना आणि पीयूष चंदेल (ट्रेनी) अशी मृत वैमानिकांचा नावे आहेत. चिमेस एव्हिएशन अकादमीच्या ट्रेनी विमानाने ढाना येथून रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी उड्डाण केले होते. अर्ध्या तासानंतर लॅण्डिंग करताना वैमानिकाला दाट धुक्यामुळे धावपट्टी दिसली नाही. त्यामुळे पीयूष चंदेल (ट्रेनी) आणि अशोक मकवाना (ट्रेनर) या दोघांचा गोंधळ उडाला. यातच विमान थेट धावपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या शेतात कोसळले. अपघाताची माहिती मिळताच चिमेस एव्हिएशन अकादमीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जखमी झालेल्या वैमानिकांना विमानातून बाहेर काढून रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले































































