
काँग्रेस सेवा दलाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करण्यात आली आहे. हे पुस्तक काँग्रेसने मागे घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
काँग्रेस सेवा दलाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सावरकर आणि गोडसे यांच्यासंदर्भात केलेले लिखाण आक्षेपार्ह असून असे लिखाण करणे चुकीचे आहे. वैचारिक मतभेद असू शकतात, पण कुणाचीही अशा प्रकारे अब्रुनुकसानी करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. सावरकर हयात नसताना त्यांच्याबद्दल वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे आणि फोल दावे करून त्यांची बदनामी करण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. विनाकारण वाद निर्माण करणारे सेवा दलाने प्रकाशित केलेले पुस्तक काँग्रेसने मागे घेण्यात यावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.
रणजित सावरकर रुग्णालयात दाखल
स्कातंत्र्यवीर साकरकर यांचे नातू रणजित साकरकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना माहीम येथील रहेजा फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सावरकरांची बदनामी करणारे लिखाण करण्यात आल्याने वाद सुरू असून याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. या विषयावरील डिबेट शोमध्ये रणजित सावरकर सहभागी झालेले असतानाच उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




























































