जानेफळ येथे भीषण आगीत तिन दुकाने बेचिराख; दोन कोटींचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जानेफळ येथील बसस्टॉप परिसरातील श्रीपुष्प ट्रेडर्स, श्रीकृष्ण अ‍ॅग्रो सेंटर कृषी सेवा केंद्र नवदुर्गा स्विट मार्ट, रविवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान लागलेल्या आगीत जळून खाक झाले आहे. तर इतर 9 दुकानांना आगीच्या झळामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापार्‍यांचे 1 कोटी 94 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील बसस्टॉप परिसरातील जितेंद्र राजपुरोहीत यांच्या नवदुर्गा स्विट मार्टला अचानक आग लागली. ही बाब सकाळी चार वाजेदरम्यान विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी बसस्टॉपवर आलेल्या नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ जानेफळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिलीप मसराम, दुकान मालकांना व नागरिकांना आगीबाबत माहिती दिली. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे बाजुच्या श्रीकांत छापरवाल यांचे श्रीपुष्प ट्रेडर्स आणी जिवन पाटील धोटे यांचे श्रीकृष्ण अ‍ॅग्रो सेंटर कृषी सेवा केंद्र आगीच्या भक्षस्थांनी आल्यामुळे तिनही दुकाने जळून खाक झाली. आग विझवण्यासाठी डॉक्टर असोसिएशनने अग्निरोधक यंत्र उपलब्ध करून दिली. त्याचा वापर करुन पवन राठी यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु मेहकर, लोणार व चिखली येथील अग्निशमन दलाची वाहने आणि देवानंद कृपाळ आणि ए. जी. कंट्रक्शनचे पाण्याचे टॅकर आल्यानंतर गावकरयांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीच्या झळामुळे गणेश शिंगणे, गजानन शेळकेसह इतर 8 दुकानदारांचे सुद्धा नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.