
कामगारांसाठी असलेल्या जेएनपीटी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट जेएनपीटी प्रशासनाने घातला आहे. याची कुणकुण लागताच जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कामगारांनी रुग्णालयासमोर निदर्शने केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही घेराव घालून निषेध व्यक्त करण्यात आला.
जेएनपीटी कामगारांसाठी कामगार वसाहतीमध्ये एकमेव रुग्णालय आहे. याआधीच न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आलेले ट्रॉमा सेंटर जेएनपीटी प्रशासनाने चालविण्यासाठी याआधीच एमजीएम या खासगी संस्थेकडे सुपूर्द केले आहे. त्यानंतर कामगारांसाठी असलेल्या या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट जेएनपीटी प्रशासनाने घातला आहे. याची कुणकुण लागताच जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संघटनेच्या कामगारांनी रुग्णालयासमोरच जोरदार निदर्शने केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही घेराव घालून निषेध व्यक्त केला. यावेळी जेएनपीटी रुग्णालयाच्या खासगीकरणा विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.






























































