शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान हप्त्यांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमधील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान वार्षिक हप्त्यात देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज दिली. याचा फायदा राज्यातील 3 लाख 29 हजारांहून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होईल.

राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये व सैनिकी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायती या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील माध्यमिक विभागामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि अर्धवेळ शिक्षक/शिक्षकेतर अशा एकूण 3 लाख 29 हजार 548 कर्मचाऱयांना होईल असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांची थकबाकी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असणारे आणि अंशतः अनुदानित शाळामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अर्धवेळ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकबाकी रोखीने मिळेल.

माहुल एमएमआरडीए कॉलनी परिसरात राहणाऱया रहिवाशांनी स्थलांतराच्या मागणीसाठी आझाद मैदानात गुरुवारी जोरदार निदर्शने केली. केमिकल कंपन्यांच्या सान्निध्यात राहणाऱया माहुलवासीयांना अस्थमा, टीबी, कॅन्सर आणि गंभीर त्वचा रोगांसारखे आजार जडले आहेत. तब्बल साडेपाच हजार कुटुंबे रोजच मरणयातना सोसत आहेत.