लांजा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला, चौरंगी लढतीत एकतर्फी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांजा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्षासह 9 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला. शिवसेनेनेचा भगवा फडकल्यावर उपस्थित शेकडो शिवसैनिकांनी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करीत ‘शिवसेना जिंदाबाद’च्या घोषणा देत जल्लोष साजरा केला.

लांजा नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक गुरुवार रोजी पार पडली व शुक्रवार सकाळी 10 वाजल्या पासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर बाईत यांनी 637 मतांनी विजय मिळवला. मनोहर बाईत यांना 3566, काँग्रेसचे राजेश रामचंद्र राणे 2929, भाजपचे सुमंत गजानन वाघधरे 1087, अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्षा संपदा योगेश वाघधरे यांना 1567 आणि अपक्ष उमेदवार रुपेश विजय गांगण यांना 537 मते मिळाली. मनोहर बाईत यांनी 637 मतांची आघाडी घेत प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष होण्याचा मान पटकाविला आहे.

lanja

शिवसेनेच्या विजयासाठी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राजन साळवी, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका संपर्क प्रमुख जगदीश जुलूम, उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकर, तालुका प्रमुख संदीप दळवी, लांजा शहर प्रमुख गुरूप्रसाद देसाई यांनी नियोजन करून विशेष मेहनत घेतली.

17 जागांचा निकाल –

शिवसेना – 9
भाजप – 3
अपक्ष – 3
काँग्रेस – 2