सीएएविरोधात 24 जानेवारीला मुंबईत विशाल रॅली, शरद पवार नेतृत्व करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar

सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे जनहितविरोधी कायदे आणि केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात मुंबईत विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष आणि संघटना या रॅलीमध्ये सहभागी होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत.

कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरता तिरंगा झेंडय़ाखाली ‘हम भारत के लोग’ या नावाने हे आंदोलन छेडले जाईल. 24 जानेवारीला दुपारी दादर येथील हुतात्मा बाबू गेनू कामगार स्टेडियमवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, वाहतूक पोलीस, दंगल नियंत्रण पथक, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, स्काऊट आणि गाइड्सची पथके यांचे संचलन होते. प्रजासत्ताक दिन जवळ आल्याने या संचलनाचा जोरदार सराव सुरू आहे. मुंबई पोलिसांचे संचलन पथक नायगाव येथील पोलीस मैदानात सराव करत आहे. उत्कृष्ट संचलन करणाऱया पथकाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येते.