बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला योग्यवेळी उत्तर देऊ – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
devendra-fadnavis

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला योग्यवेळी उत्तर देऊ, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केले. फडणवीस संभाजीनगर येथे जाण्यासाठी नगरच्या शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल फडणवीस यांना विचारले असता त्यांनी योग्य वेळ आल्यावर आपण त्यांना उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली.

भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या निवडी शुक्रवारी होणार होत्या. मात्र, त्या रखडल्यामुळे शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन सुमारे 10 मिनिटे बंद खोलीआड चर्चा केली. चर्चा काय झाली, हे सांगण्यास पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. मात्र, स्थानिक घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आपला अंदाज वर्तवतात, मात्र त्यांचा अंदाज नेहमीच चुकतो. विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता राहणार नाही, 220 पेक्षा जास्त जागा येणार, असे ते म्हणाले होते, परंतु त्यांचे कोणतेच म्हणणे खरे ठरले नाही. त्यांची सर्व भाकितं फोल ठरली, त्यामुळे त्यांनी चांगला ज्योतिषी बघावा, असा खोचक टोला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. त्यावर फडणवीस यांनी योग्यवेळी उत्तर देऊ असे सांगितले.