#JammuKashmir सुरक्षा दलांकडून चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या त्राल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. इंडिया टुडे या संकेतस्थळाने हे वृत्त दिलं आहे.

पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार या भागात शोधमोहीम राबवण्यात आली. रविवारी सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरण्यात आलं. दहशतवाद्यांकडून यावेळी गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे.

दुसरीकडे रविवारी कश्मीरच्या कुलगाम भागात सुरू असलेल्या तपासणीदरम्यान तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे तिन्ही दहशतवादी एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीतून जात होते. यातील एक दहशतवादी नवीद बाबू उर्फ सैय्यद नवीद हा हिजबुल मुजाहिद्दीनच्या प्रमुखांपैकी एक असल्याचं वृत्त आहे.