
समाजातील तुमच्या प्रतिष्ठेचा वापर करून लोकांमधले नौदलाबाबत सोशल मीडियावर पसरणारे गैरसमज दूर करा. माजी सैनिक म्हणून तुमचे ते कर्तव्यच ठरते, असे आवाहन नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह यांनी सैन्य दलातील निवृत्त सैनिकांना मंगळवारी केले. ‘फोर्थ आर्म्ड फोर्सेस व्हेटरन्स डे’च्या निमित्ताने ते एका कार्यक्रमात बोलत होते.
करमबीर सिंह पुढे म्हणाले की, सैन्य दलातून निवृत्त झालात म्हणून काय झाले, सध्याचे कर्मचारी आणि तुमच्यात एक संबंध कायम ठेवा. सूचना, शिफारशी, सल्ले लष्करातील कुणाही अधिकार्याला द्यायला घाबरू नका. आजचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. येथे चांगली माहिती एकमेकांना शेअर करणे खूपच सोपे झाले आहे. त्याचाच वापर करत लोकांमधील नौदलाबाबत गैरसमज दूर करा असेही त्यांनी सैन्य दलातील ज्येष्ठांना सांगितले.

























































